ट्रकला आग लावल्या प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 04 June 2025


सातारा : ट्रकला आग लावल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट परीसरातील वाईन शॉप च्या समोर ट्रकचा क्लीनर सूर्यकांत जाधव याने ट्रक मालकाने बोलण्याचा राग मनात धरून बाटलीतील पेट्रोलचे बोळे आतमध्ये टाकून ट्रक पेटवून दिला. या आगीत ट्रकचे सुमारे 7140 रुपये किंमतीचे नुकसान झाले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरातील विक्रेत्यांसाठी नव्या पर्यायी जागेची पाहणी
पुढील बातमी
एकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या