सज्जनगडावरील बुरुजाची दगडे आली खाली

by Team Satara Today | published on : 26 August 2024


सातारा : ऐतिहासिक सज्जनगड किल्ला हा सातारा शहरापासून अवघ्या पंधरा कि. मी. वर आहे. या मार्गावर जाणार्‍या प्रमुख छ. शिवाजी महाराज महाद्वाराच्या उजव्या बाजूच्या बुरुजाची दगडे रविवारी रात्री सुरु असलेल्या मुसळधार पावसाने निसटून पायर्‍यांवर खाली आली. दोन दिवस झाले तरीही ती दगडे तशीच आहेत. त्यामुळे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी शिवप्रेमींमधून होत आहे.
सज्जनगड येथे दररोज शेकडो भाविक तसेच पर्यटक भेट देतात. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड ओळखला जातो. या गडावर जाणार्‍या मुख्य महादरवाजाच्या उजव्या बाजूच्या बुरुजाची दगडे सुरु असलेल्या पावसामुळे रविवारी रात्री 8.30 वाजता खाली आली. त्यावेळी मार्गावर जोरात आवाज झाला. सुदैवाने कोणीही तेथून जात नव्हते. गडावर आणि गडाच्या पायथ्यालाच थांबलेल्यांनी हा आवाज ऐकल्याचे सांगण्यात येते. सुरु असलेल्या पावसामुळे ही पडझाड झाली आहे. तसेच पार्किंगच्यावरील रस्त्यावरही मातीचा भराव ढासळला आहे. दोन दिवस झाले ढासळलेली दगडे तशीच रस्त्यात पडलेली आहेत. त्यामुळे त्या दगडांवरुन भाविक, पर्यटकांना ये-जा करावी लागत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘हुंबरळी’ पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू
पुढील बातमी
सातार्‍यात गणेशोत्सव शांतता कमिटीची बैठक

संबंधित बातम्या