सातारा : सातारा पालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या 295 हरकतीवर सातारा प्रांत आशिष बारकुल यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीतील म्हणणे ऐकून घेऊन त्यावरच्या प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेले आहेत. यावेळी बालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट उपस्थित होते.
सातारा पालिका सार्वत्रिक निवडणूक निमित्ताने राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला होता. त्या अनुषंगाने सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी मतदार यादी फोडून प्रारूप मतदारांच्या सूचना व हरकती मागवल्या होत्या यामध्ये 976 जणांनी हरकती घेतल्या संबंधित हरकतदारांना नोटीसा काढून सुनावणीस उपस्थित राहण्यास बजावले होते. या हरकतींच्या अनुषंगाने सुनावणीच्या कामकाजाचे नियोजन सातारा प्रांत आशिष बारकुल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या उपस्थितीत पार पडले.
दिनांक 27 रोजी 80, दिनांक 28 रोजी 130,दिनांक 29 रोजी 150 जणांची सुनावणी घेण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या सुनावणी प्रक्रियेत 330 जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी 295 जण सुनावणीला उपस्थित राहिले, तर 35 जणांनी या सुनावणी कडे पाठ फिरवली. सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे 31 रोजी मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला कळवला जाणार आहे केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असून या सुनावणी प्रक्रियेसाठी विश्वास गोसावी, मोहन प्रभुणे यांनी सहकार्य केले.