पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

by Team Satara Today | published on : 08 October 2025


नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. या उद्घाटनामुळे नवी मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील नागरिकांचे हक्काचे विमानतळ आजपासून सेवेत आले आहे. 

विमानतळाच्या उद्घाटनामुळे मुंबईवर असलेला हवाई वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. NMIA चे उद्घाटन आज झाले असले तरी, ते लगेचच पूर्ण क्षमतेनं सेवेत येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांना या विमानतळाची पूर्ण सेवा डिसेंबर महिन्यापासून उपलब्ध होईल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून, त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
काश्मिरमधील गडोल जंगलात लष्काराचे दोन जवान गायब
पुढील बातमी
सर्दी खोकल्यासाठी किचनमधील 'हे' पदार्थ देतील आराम

संबंधित बातम्या