डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका भूमिपूजन सोहळा संपन्न

by Team Satara Today | published on : 30 August 2025


सातारा : कळंभे, तालुका वाई याठिकाणी भव्य अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

सातारा जिल्ह्यातील कळंभे, तालुका वाई या ठिकाणी भव्य अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभे राहत असून, दिनांक २९ ऑगस्ट रोजी या भव्य वास्तूचे भूमिपूजन ग्रामपंचायत कळंभेचे प्रथम नागरिक व सरपंच नीलम शिवथरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी उपसरपंच शकुंतला चव्हाण, माजी सरपंच ज्योती गायकवाड, माजी उपसरपंच सारिका गायकवाड, माजी उपसरपंच आबाजी सुतार, कळंभेच्या  तलाठी अंकिता लोखंडे आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार मोतलिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या वास्तूचे काम अंदाजे फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होऊन, पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा काय असते व तिची तयारी कशी करायची याची प्राथमिक माहिती देऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. जेणेकरून भविष्यात परीक्षेची तयारी करण्यासाठी काही प्रमाणात चांगली मदत होईल, कारण कळंभे भागातील मुलांना स्पर्धा परीक्षा काय असते, हेच माहिती नाही. त्यामुळे याची तयारी करणे तर लांबच आहे. त्यामुळे या अभ्यासिकेचा सर्वच विद्यार्थ्यांना लाभ होणार असून भविष्यात या कळंभे पंचक्रोशीतील विद्यार्थी मोठे अधिकारी होतील, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते तुषार मोतलिंग यांनी व्यक्त केली. 

यावेळी युवा कार्यकर्ते प्रतीक मोतलिंग, किरण मोतलिंग, प्रमोद मोतलिंग, भरत मोतलिंग, आशुतोष मोतलिंग, अनिकेत मोतलिंग, देवराज मोतलिंग, सुधीर मोतलिंग, विशाल मोतलिंग, आकाश मोतलिंग व कळंभे ग्रामस्थ उपस्थित होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वेण्णा लेकनजीक आढळले अजगर
पुढील बातमी
दहशतवाद्यांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ ह्यूमन GPS चकमकीत ठार

संबंधित बातम्या