ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य शिबीर व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

1 ऑक्टोबर रोजी सातारा समाजकल्याण कार्यालयाकडून आयोजन

by Team Satara Today | published on : 27 September 2025


सातारा  :  ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना  वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे शारीरिक जीवन व मानसिक आरोग्य सुसह्य व्हावे यासाठी 9 जुलै 2018 रोजीच्या शासन शासन निर्णयातील सर्वसमावेशक धोरणानुसार  सातारा जिल्ह्यात दि. 1 ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा कार्यालयाकडून साजरा करण्यात येत आहे. 

यानुसार एक ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, एम.आय.डी.सी. रोड, सातारा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणा-या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार व गौरव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी दिली.

सर्व नागरिकांनी सत्काराच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे

सातारा जिल्हयातील सर्व नागरिकांनी सत्काराच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी मोफत वैद्यकीय तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी आवाहन केलेले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यात पुढील ६ दिवस धोक्याचे? मुसळधार पावसाचा इशारा
पुढील बातमी
श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयात ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांना श्रद्धांजली

संबंधित बातम्या