सातारा : मराठा साम्राज्याची राजधानी असलेला सातारा-यातील शाही दसरा सिमोल्लंघन सोहळा, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावतीने मोठया उत्साहात आणि जनतेच्या सहभागाने साजरा होत असतो. हा उत्सव सोहळा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याबाबतच्या मागणीवरील निर्णय मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवीस यांचेशी लवकरच चर्चा करुन घेवू असे ठोस आश्वासन आज सातारचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन-खाण मंत्री ना. शंभुराज देसाई यांनी दिले आहे.
याबाबतची माहीती भारतीय जनता पार्टीचे समन्वयक तथा जिल्हा परिषदेचे माजी अर्थ सभापती सुनील काटकर यांनी दिली आहे. सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आ. महेश दादा शिंदे, आ.मनोज दादा घोरपडे यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर यांनी दिले असून ते स्विकारलेले आहे.
त्या निवेदनामध्ये सातारचा शाही दसरा सिमोल्लंघन सोहळयाला राज्यशासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दयावा तसेच याकरीता निधी दयावा, अशी मागणी केलेली आहे. सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 25 रोजी मी मुंबईला जात आहे, तेथे मा. मुख्यमंत्री ना.देवेद्र फडणीस यांचेशी चर्चा करुन, सातारचा शाही दसरा
सिमोल्लंघन सोहळा हा दरवर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करणेबाबत निर्णय घेवु असे ठाम भाष्य सातारचे पालकमंत्री ना. श्री. शंभुराज देसाई यांनी केले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांचेही या कामी मोलाचे योगदान लाभत आहे त्यामुळे सातारचा शाही दसरा हा राज्य महोत्सव म्हणून साजरा होण्याबाबत पावले पडत आहेत.
लवकरच याबाबत शासनपातळीवर निर्णय होवून, सातारचा शाही दसरा पारंपारिक पध्दतीने परंतु मोठया उत्साहात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते प्रथेप्रमाणेजनसहभागाव्दारे साजरा करण्यात येईल, असा विश्वास आहे असेही सुनील काटकर यांनी कळविले आहे.
ना.शंभुराज देसाई यांना निवेदन देताना, सुनील काटकर यांचे बरोबर, बाजारसमितीचे माजी संचालक काका धुमाळ, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पंकज चव्हाण, जिल्हापरिषदचे माजी सदस्य बाळासाहेब गोसावी, संग्राम बर्गे, श्रीकांत आंबेकर, राम हादगे, शफी इनामदार, संतोष कणसे, चिन्मय कुलकर्णी,
अमोल सणस, बाळासाहेब राक्षे, संदिप शिंदे, चिखलीचे माजी सरपंच सुरेश शिर्के, यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते, शिवप्रेमी उपस्थित होते.