शोषणमुक्ती हा कॉ. शरद पाटील यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू - कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के; कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय चर्चासत्रास प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 07 April 2026


सातारा : कॉ. शरद पाटील यांच्या साहित्याचा गाभा हा शोषणमुक्तीचा असल्याचे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले. 

येथील कला व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ व विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्या संयुक्तविद्यामाने आयोजीत एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलिप गायकवाड हे होते. 'कॉ. शरद पाटील यांच्या साहित्यातील सौंदर्यशास्त्र' या चर्चासत्राचा विषय होता.

कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के म्हणाले, कॉ. शरद पाटील यांनी प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. या तत्वज्ञानाची त्यांनी आताच्या काळासाठी तार्किक मांडणी केली. बौध्द तत्वज्ञानाचा अभ्यास करताना त्यांनी त्याची आजच्या काळातील उपयुक्तता आपल्या लिखाणातून सादर केली. कॉ. शरद पाटील यांनी मार्क्सवादाच्या तत्वज्ञानाला फुले, आंबेडकर तत्वज्ञानासी जोडून घेत नवा सांस्कृतिक अध्याय उभा केला. कार्ल मार्क्स महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारवंतांच्या विचाराला एकत्र मांडताना त्यांनी शोषणमुक्ती हाच त्यांच्या लेखन कार्याचा गाभा असल्याचा विचार प्रखरपणे मांडला. नव्या सौंदर्यशास्त्राची मांडणी करून कॉ. शरद पाटील यांनी आपल्या विचाराची उंची सिध्द केल्याचे ही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय चर्चासत्राचे बीजभाषण मुंबई विद्यापीठचे डॉ. अनिल सपकाळ यांनी केले. यावेळी 'कॉ. शरद पाटील पाटील यांचा सौंदर्यशास्त्र विचार' या विषयावर डॉ. रणधीर शिंदे, 'नव्या सौंदर्यशास्त्राची गरज' या विषयावर विद्रोहीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, 'शोषणमुक्तीचे सौंदर्यशास्त्र' या विषयावर प्रा. सचिन गरूड यांनी वैचारिक मांडणी केली.


चर्चासत्राच्या समारोप सत्रास प्राचार्य डॉ. सतिश घाटगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष म्हणून सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन जयेंद्र चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाविद्यालयात अशा विचारावर मंथन झाले पाहीजे असे मत मांडले. या चर्चासत्रात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे व मुंबई विद्यापीठ, मुंबई येथील अभ्यासक व प्राध्यापक सहभागी झाले होते. चर्चासत्राचे प्रास्ताविक डॉ. भरत जाधव व आभार प्रा. गौतम काटकर यांनी मानले. या आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे संयोजन महाविद्यालयातील मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातर्फे करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राष्ट्रीयत्व हा एकजिनसी समाजाचा खरा गाभा आहे - शंकर माळवदे; साताऱ्यात जिल्ह्यातील पहिले हिंदू संमेलन उत्साहात
पुढील बातमी
सातारा नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह ; ४२ विषयांना गडबडीत मंजुरी; अतिक्रमण, पाणीटंचाई, स्वच्छतेवरून धुरळा

संबंधित बातम्या