सातारा : अवैधरीत्या दारू विक्री केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी कण्हेर, ता. सातारा येथील एका पान टपरी च्या पाठीमागे तेथीलच सतीश बजरंग वाघमळे हे दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून 910 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या कारवाईत, लिंब ता.सातारा येथे तालुका पोलिसांनी बेकायदा दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल केला. या कारवाईत पोलिसांनी महिलेकडून १७८५ रुपये किंमतीच्या ५१ दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.