सातारा : कालकथित अशोकराव शंकर काकडे यांचे अल्पशा आजाराने दिनांक 30 रोजी निधन झाले असून अशोक काकडे हे शाहू फुले आंबेडकरवादी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते म्हणून फलटण तालुक्यास परिचित होते.
14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी लाखो जनसमुदाया समवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यावेळेस बु.अशोक काकडे यांचे वडील बु. शंकरराव काकडे (हेरम आबा) हे दोन्ही पायांनी अपंग असताना देखील आपल्या वडिलांसमवेत काकडे यांना देखील घेऊन नागपूर येथील पवित्र धम्मभूमीवर दीक्षा घेतली होती. बुद्धवासी अशोक काकडे हे चंदन काकडे (वस्ताद) यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे, सून, बहीण इत्यादी परिवार आहे.