सातारा : राहत्या घरातून एक वृद्ध बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 29 रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास दिनकर कृष्णा मोरे राहणार रामनगर तालुका सातारा हे राहत्या घरातून भिक्षा मागण्यासाठी जातो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.