सातारा शहरात विसर्जन मिरवणूक तयारीची लगबग

पोलीस बंदोबस्ताचा आढावा; विद्युत रोषणाई फुलांची आरास, ढोल पथके सज्ज

by Team Satara Today | published on : 16 September 2024


सातारा : ऐतिहासिक शाहू नगरीच्या गणेशोत्सवाचे वैभव असलेली विसर्जन मिरवणूक मंगळवार दिनांक 17 रोजी अनंत चतुर्दशीला होत आहे. गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यासाठी मानाच्या गणेश मंडळांसह सर्वच मंडळांची विसर्जन मिरवणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकीचा ताण टाळण्यासाठी अनंतचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला सातार्‍यातील 46 गणेशोत्सव मंडळांची सातारा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस बंदोबस्ताच्या दृष्टीने सज्ज झाले असून साडेपाचशे पोलिसांचा वॉच या मिरवणुकीवर राहणार आहे. याचा आढावा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घेतला.
गणरायाचे विसर्जन अनंत चतुर्दशी दिवशी मंगळवार दिनांक 17 रोजी होणार आहे. त्यामुळे सातारा शहरातील अडीचशे मंडळांपैकी 46 सार्वजनिक मंडळाचे गणपती सोमवारी विसर्जित होणार असल्याने सातारा शहरांमध्ये पोलीस बंदोबस्ताची लगबग जाणवली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या नेतृत्वाखाली दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक 17 सहाय्यक पोलीस निरीक्षक एस आर पी एफ ची एक तुकडी आरसीपीचे 19 वाहतूक शाखेचे 25 व शहर पोलीस ठाण्याचे 102 कर्मचारी बंदोबस्त तैनात होते. सातारा शहरातील 46 गणेशोत्सव मंडळांचे महाप्रसाद आणि मंडळाच्या आरती उरकल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. ढोल ताशे विसर्जन मिरवणुका आणि आकर्षक देखावे विद्युत रोषणाई यांचे सत्र रात्री आठच्या नंतर दिसू लागले ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. शहराच्या मध्यवर्ती मोती चौकामध्ये विसर्जन मिरवणुकांसाठी सार्वजनिक मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक मार्गावर गर्दी होऊ लागल्याने तेथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
शहरातील काही महत्त्वाच्या मंडळांच्या गणरायांचे विसर्जन होत असल्याने स्ट्रायकिंग फोर्स सह पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता पोलीस उपाधीक्षक राजीव नवले यांनी स्वतः या बंदोबस्ताचा आढावा घेतला. शहरात दुचाकीवरून तब्बल 15 फिरती पथके णीसाठी आहेत प्रत्येक दुचाकी वर दोन कर्मचारी याशिवाय छेडछाड विरोधी व निर्भयापथकाचे कर्मचारी स्वतंत्रपणे तैनात राहणार आहेत सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकीवर 17 सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन कॅमेराची नजर राहणार आहे सातार्‍यात मुख्य विसर्जन मिरवणूक 18 तासापेक्षा अधिक काळ चालते त्यामुळे येथे पोलिसांनी तीन ड्रोन चा वॉच ठेवला आहे. याशिवाय सरकारी व खाजगी चार कॅमेर्‍याची व्यवस्था करण्यात आली आहे विसर्जन मिरवणुकीवर 52 सीसीटीव्ही कॅमेरे व शहरात ठीक ठिकाणी दीडशेहून अधिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत पोलीस दलाच्या मदतीसाठी गृहरक्षक दलाचे 52 तर पोलीस बॉईज म्हणून 45 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे
सातारा पालिकेने सुद्धा 25 टनी क्रेनची व्यवस्था केली असून सीसीटीव्ही तसेच मुख्य विसर्जन तळ्यावर बॅरिगेटिंग करून संपूर्ण भाग सुरक्षित केला आहे याची पाहणी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी स्वतः केली. सातारा पालिकेचे 40 कर्मचारी येथे तीन शिफ्ट मध्ये तैनात करण्यात आले आहे रात्री उशिरापर्यंत मंडळाच्या विसर्जन व्यवस्थेची पाहणी सुरू होती टप्प्याटप्प्याने विसर्जन तळ्याकडे जाणार्‍या मिरवणुका मार्गस्थ होत होत्या तसेच जास्त आवाजाची डॉल्बी वाजणार नाही याची पुरेपूर काळजी पोलिसांनी घेत डॉल्बीचे आवाज मॉनिटर करण्याची स्वतंत्र व्यवस्था ठेवली होती डॉल्बी पेक्षा बहुतांश मंडळांनी पारंपारिक ढोल वाद्यांनाच पसंती दिली होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिव्हल'मध्ये प्रीमियर झालेला 'घात' हा चित्रपट येतोय आता प्रेक्षकांच्या भेटीला 
पुढील बातमी
माझ्या माघारीचे दोर जनतेने केव्हाच कापलेत : अमितदादा कदम

संबंधित बातम्या