सातारा : सातारा शहरातील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या आईने सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना दि. ४ रोजी दुपारी चार वाजता घडली.
मुलगी घरात नसल्याचे समोर आल्यानंतर मुलीच्या आईने तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, मुलगी सापडली नाही. त्यामुळे आईने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.