साताऱ्यात निवृत्त शिक्षकाचा पोलिसांवर गंभीर आरोप; अन्याय, मारहाण व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न

by Team Satara Today | published on : 28 March 2026


सातारा  :  क्षेत्रमाहुली येथील निवृत्त शिक्षक आण्णा शिवाजी पवार यांनी शहर पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पवार यांनी दावा केला आहे की, त्यांच्या चारचाकी वाहनाची सहा वेळा तोडफोड झाल्यानंतरही मूळ आरोपींवर कारवाई न करता उलट त्यांनाच व त्यांच्या भाचा आकाश इंगवले यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

तसेच, पोलीस अधिकाऱ्यांकडून अमानुष मारहाण, जबरदस्तीने सह्या घेणे, तसेच त्यांच्या मुलीला अश्लील व मानसिक त्रासदायक प्रश्न विचारल्याचा आरोप करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांकडून अपमानास्पद व धमकीवजा वक्तव्य केल्याचाही उल्लेख अर्जात करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी पवार यांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
काँग्रेसचे जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी जनसुनावणी अभियान; ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा
पुढील बातमी
साताऱ्यात केसरकर पेठेत कर्जाच्या पैशांवरून वाद; घरफोडी व धमकीचा प्रकार; संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित बातम्या