न्यायबंद्याकडे सापडले मोबाईल सीम; दोनजणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 06 March 2025


सातारा : न्यायबंद्याकडे मोबाईल सीम सापडल्यामुळे दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कारागृहात मोबाईल वापरण्यास बंदी असतानाही दोघांकडे मोबाईल सीम सापडले. यावरुन कारागृहाच्यावतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. न्यायबंदी शुभम निकम व राजू उत्तम निकम (वय 50, दोघे रा.माहुली ता.खानापूर जि.सांगली) यांच्या विरुध्द राकेश शिवाजी पवार (वय 44) या कारागृह पोलिसाने तक्रार दिली आहे. ही घटना दि. 27 फेब्रुवारी घडली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दाजीनेच केला अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार; दोनजणांवर गुन्हा
पुढील बातमी
अपघातप्रकरणी दोनजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या