सातारा : सातारा अप्पर जिल्हाधिकारी पदी मल्लिकार्जुन माने यांची आज मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. मल्लिकार्जुन माने हे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पदावर कामकाज पाहत होते. त्यांची जीवन गलांडे यांची पदोन्नतीने बदली झाल्यामुळे रिक्त पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.
मल्लिकार्जुन माने यांनी यापूर्वी सातारा उपविभागीय अधिकारी म्हणून देखील काम पाहिलेले आहे. सातारा येथून बदलीनंतर त्यांनी मुंबई उपजिल्हाधिकारी व सध्याचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पदावर काम पाहत होते. दरम्यान राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसापूर्वी उपजिल्हाधिकारी पदावरील अधिकार्यांच्या पदोन्नती केल्या. त्यामध्ये मल्लिकार्जुन माने यांची देखील पदोन्नती झाली होती. दरम्यान मंगळवारी त्यांना सातारा अप्पर जिल्हाधिकारी पदाचा पदभार सोपवण्याचे निर्देश देण्यात आले.