सातारा : जमिनीची मोजणी करुन दाखवा, असे म्हणत मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. क्षेत्रमाहुली ता.सातारा येथे ही घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौ.कल्पना अनिल आढाव यांनी सयाजी शिंदे, त्यांची पत्नी, जितेंद्र निकम, संजय जाधव, वैशाली जाधव, कणसे, कणसे यांची पत्नी यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 20 मे रोजी क्षेत्र माहुली येथे घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.