महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोनजणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 26 November 2024


सातारा : वडिलांना मारहाण झाल्याने त्याबाबतचा जाब विचारायला गेलेल्या महिलेला दोघांनी मारहाण करत महिलेचा विनयभंग केला. ही घटना दि. 24 नोव्हेबर रोजी घडली असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विक्रम माने याच्यासह अनोळखी एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. कारला अप्पर डिप्पर दिल्याच्या कारणातून तक्रारदार महिलेच्या वडिलांना संशयिताने मारहाण केली होती. ही बाब समजल्यानंतर महिलेने त्याबाबतची माहिती विचारली असता संशयितांनी महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केला.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुचाकीची चोरी
पुढील बातमी
विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी चारजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या