सातारा : लोणंद शहरातील शास्त्री चौकातून दुचाकीची चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रामदास हिरा माने (रा. सुखेड, ता. खंडाळा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार दि. 4 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास दुचाकी (एमएच,11. बीडब्लू, 7929) ची चोरी झाली. या दुचाकीची किंमत सुमारे 80 हजार रुपये होती. अज्ञाताने दुचाकी चोरुन नेल्याने लोणंद पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा