बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी रसिका केसकर व कार्याध्यक्षपदी रेश्मा वाळिंबे यांची निवड

by Team Satara Today | published on : 21 February 2026


सातारा  : बालरंगभूमी परिषदेच्या वार्षिक सभेमध्ये नवीन कार्यकारणीची रचना करण्यात आली. परिषदेच्या अध्यक्षपदी रसिका केळकर व कार्याध्यक्षपदी रेश्मा वाळिंबे यांची निवड करण्यात आली. कार्यकारणीतील जुन्या सदस्यांना परिषदेला वैयक्तिक अडचणीमुळे वेळ देता येत नसल्यामुळे या परिषदेची पुनर्रचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या नवनियुक्त कार्यकारिणीचा नुकताच सत्कार करण्यात आला.

परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा १९ फेब्रुवारीला पार पडली.  बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखेकडून कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, कोषाध्यक्ष नंदकुमार जुवेकर, कार्यकारिणी सदस्य वेदा सोनुले हे यावेळी उपस्थित होते. गेल्या दीड वर्षात  लहान मोठ्या आशा जवळपास 10 ते 12 वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन सातारा शाखेने अत्यंत उत्तम पद्धतीने करून दाखवले. पुर्वीचे अध्यक्ष निलेश माने यांना तसेच जुन्या कार्यकारीणीतील काही सदस्यांना त्यांच्या वयक्तिक कारणांमुळे पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे यावेळी सर्वानुमते नवीन कार्यकारिणी  ठरविण्यात आली.  

बालरंगभूमी परिषद शाखा साताराची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - सौ. रसिका केसकर, कार्याध्यक्ष - सौ.रेश्मा वाळिंबे, उपाध्यक्ष - डॉ. शीतल इनामदार आणि कुमार मोने, प्रमुख कार्यवाह - ईशान केसकर, कोषाध्यक्ष - श्रुती दोशी, सहकार्यवाह - मयुरेश देशपांडे आणि आनंद कदम, समन्वयक - ऐश्वर्या पाटील आणि भाग्यश्री पवार, प्रमुख सल्लागार - डॉ. निलेश माने आणि मृणाल शिंदे तर कार्यकारिणी सदस्य म्हणून - हेरंब जोशी,  डॉ. मिलिंद सुर्वे,  गौरी हेंद्रे, सौरभ आफळे, जमीर अत्तार, चित्रा भिसे,  सिद्धी नारकर, शैलजा कदम, सुमित साठे, धैर्यशील उत्तेकर, कुलदीप मोहिते, संदीप गाडे यांची निवड झाली आहे . 

सभेवेळी सातारा शाखेची माजी अध्यक्ष निलेश माने यांनी मागील वर्षाचा आढावा घेतला. तर नवनिर्वाचित अध्यक्ष रसिका केसकर यांनी पुढील काळासाठीची भूमिका मांडली.  राजीव तुलालवार आणि नंदकुमार जुवेकर यांनी नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन केले.  रेश्मा वाळिंबे यांनी आभार मानले. मुख्य शाखा अध्यक्ष नीलम शिर्के तसेच सतीश लोटके, तुषार भद्रे, बाळकृष्ण शिंदे, नितीन दीक्षित, राजीव मुळ्ये, दीपक देशमुख, राहुल केसकर आदी मान्यवरांनी नवीन कार्यकरणी सदस्यांचे अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कंत्राटी पद्धत रद्द करून एक लाख सफाई कर्मचाऱ्यांची भरती करा - अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्षचरणसिंग टाक यांची मागणी
पुढील बातमी
केसरकर पेठेतून विवाहिता बेपत्ता; सातारा शहर पोलिसांत मिसिंगची नोंद

संबंधित बातम्या