सदरबझारमध्ये सुमारे लाखाची घरफोडी

by Team Satara Today | published on : 06 March 2025


सातारा : सदरबझार, सातारा येथे डॉक्टरचे कुटुंब परगावी गेल्यानंतर चोरट्यांनी बंद बंगला टार्गेट करुन रोख रक्कम व सोने असा सुमारे 94 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डॉ.सुभाष दिगंबर दर्भे (वय 76, रा.सदरबझार) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 2 मार्च ते 5 मार्च या दरम्यान घडली आहे. चोरट्यांनी बंद बंगल्यातून दीड तोळ्याची चैन, दीड तोळ्याचे ब्रेसलेट, रोख 25 हजार रुपये असा ऐवज चोरुन नेला.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातप्रकरणी दोनजणांवर गुन्हा
पुढील बातमी
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात कारने घेतला पेट; कार जळून खाक

संबंधित बातम्या