सातारा : सातारा शहरातील दोन दारु अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी सातारा शहरातील चिपळूणकर बाग येथील पत्र्याच्या शेडच्या आडोशास दारू विक्री करताना सोमनाथ शत्रुघ्न गायकवाड रा. सदर बाजार, सातारा हे आढळून आले. त्यांच्याकडून 980 रुपये किमतीचे देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या घटनेत कासट मार्केट ते तहसील कार्यालय रस्त्यावरील नगरपालिकेचे गाळ्याशेजारील आडोशाला प्रशांत मोतीलाल कलाल रा. सदर बाजार, सातारा हे दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून 13 हजार 440 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.