लोणंद पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची दमदार कारवाई

सराईत डीपी आणि मोटरसायकल चोरटे जेरबंद; सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

by Team Satara Today | published on : 01 March 2025


सातारा : ट्रान्सफॉर्मर आणि मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना लोणंद पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने जेरबंद केले आहे. चोरट्यांकडून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत डीपी चोरीचे सत्र सुरू होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी सपोनि सुशील भोसले यांना डीपी चोरीतील आरोपींना पकडण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी आरोपी पकडण्यासाठी लोणंद पोलीस ठाण्याचे डीबी पथक व अंमलदारांचे एक पथक तयार केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुशील भोसले यांनी पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्रगस्तित वाढ करून सोबत एमएसईबी चे वायरमन सुद्धा बरोबर ठेवले.

याचबरोबर भोसले यांनी डीबी पथक आणि पोलीस अंमलदारांसह संशयितांच्या शोधासाठी कोंबिंग ऑपरेशन राबवले होते. यानंतर बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार डीपी चोरी ही संज्या नमन्या पवार आणि आदित्य संज्या पवार दोघे रा. झणझणे, सासवड, माळीबेंद, ता. फलटण, जि. सातारा हे व त्यांच्या साथीदारांनी केल्याचे समजले. तसेच ते त्यांच्या राहत्या घरी असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सापळा रुचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. संज्या पवार आणि आदित्य पवार यांनी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील डीपी पाडून आतील तांब्याची तार चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांना अटक केल्यानंतर संज्या पवार याने त्याच्या वाटणीला आलेली तांब्याची तार तसेच चोरी केलेल्या चार मोटरसायकली असा एकूण 3 लाख 11 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. तो जप्त करण्यात आला आहे. या दोघांनी सासवड, हिंगणगाव, तरडगाव, पिंपरी बुद्रुक, टाकूबाईची वाडी, निंबोडी, काळज, रावडी आदी गावांतील डीपी चोरल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी लोणंद आणि फलटण हद्दीतील डीपी चोरले असल्याबाबतचीही कबुली दिली आहे.

या कारवाईत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुशील भोसले, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, देवेंद्र पाडवी, दिलीप येळे, विष्णू धुमाळ, नितीन भोसले, रत्नसिंह सोनवलकर, सर्जेराव सुळ, विजय पिसाळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, केतन लाळगे, विठ्ठल काळे, रमेश वळवी, अंकुश कोळेकर, सतीश दडस, जयवंत यादव, संजय चव्हाण यांनी सहभाग घेतला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी इम्तियाज मुजावर यांची निवड
पुढील बातमी
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

संबंधित बातम्या