......अन्यथा,परभणीत जाऊन हजारोंच्या संख्येनी आंदोलन करू : प्रतीक गायकवाड

by Team Satara Today | published on : 14 December 2024


सातारा :  संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेल्या अवामानाप्रकरणी त्या माथेफिरुवर फेरुवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून मुख्य सूत्रधार कोण आहे? त्याचा शोधा घ्या. अन्यथा, आरपीआयतर्फे हजारोंच्या संख्येने परभणीत जाऊन आंदोलन छेडण्यात येईल. असा गर्भित इशारा जिल्हा युवा उपाध्यक्ष प्रतीक गायकवाड यांनी दिला आहे.

परभणीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असून संविधानाचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. ज्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाचे संविधान लिहिले त्याच संविधानावरती हा भारत देश चाललेला आहे. त्याच संविधानाचे परभणी येथे एका माथेफिरोकडून संविधानाचा अपमान झालेला आहे. विटंबना केलेली आहे. म्हणून संबंधितावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. मुख्य सूत्रधारही कोण आहे?  त्यांचा शोध घ्यावा. अन्यथा, येत्या वीस दिवसात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथे जाऊन तीव्र निषेध आंदोलन करणार आहोत. जर त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. असेही निवेदनाद्वारे गायकवाड यांनी कळविले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
16 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
पुढील बातमी
डीआरआयकडून ९.६ कोटी रूपयांचे १२ किलो सोने जप्त

संबंधित बातम्या