सातारा : सातारा येथील मोळाचा ओढा येथे एका हॉटेलच्या समोर हिरव्या नेटच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी धडक कारवाई केली.
दि. ९ रोजी सायंकाळी ५ वाजता ज्ञानेश्वर गोपाळ साबळे (वय ३0, रा. मंगळवार पेठ, सातारा) हा जुगार चालवत असताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ८00 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.