सातारा : शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास इमरान बिलायत शेख रा. केसरकर पेठ, सातारा यांना शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी संयोग जगन्नाथ कुंभार रा. ल्हासुर्णे, ता. कोरेगाव, जि. सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी एका विरोधात तक्रार
by Team Satara Today | published on : 15 March 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा