सातारा : महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन खासदार उदयनराजे यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. राज्य व स्थानिक पातळीवरील विकासकामे, नागरिकांच्या सुविधा आणि भविष्यातील उपक्रम याबाबत सकारात्मक विचारमंथन झाले. ही भेट सातारा परिसराच्या विकासासाठी चालना देणारी ठरेल, असे खासदार उदयनराजे यांनी सांगितले.
याप्रसंगी सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, सातारा नगरपरिषदेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक शंकर माळवदे, पंकज चव्हाण, नगरसेविका सिद्धी पवार, ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत ढाणे बापू, माजी नगरसेवक किशोर शिंदे, नासीर शेख, अॅड. अंकुश जाधव, अॅड. विनीत पाटील, सुशांत निंबाळकर, मनीष शेठ महाडवाले, तेजस जगताप उपस्थित होते.