सातारा : मोती चौकातील अगरबत्ती व्यावसायिक आणि चप्पल व्यावसायिक यांच्या दुकानातील साहित्यावर धूळ उडत असल्याचा कारणातून वाद निर्माण झाला. यावेळी एकमेकांच्या मालाची मोडतोड करून नुकसान केल्याप्रकरणी दोघांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी केल्या असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी संतोष पोपळकर (वय ५२,राहणार गडकर आळी) आणि मीनाज मुनीर इनामदार (वय ५०,रा. कोंडवे) यांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के करत आहेत.