कराडमध्ये कपडे विक्रीचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 21 September 2025


कराड  :  येथील बसस्थानकासमोर फुटपाथवर कपडे विक्रीचा व्यवसाय करणार्‍या अरुण जगन्नाथ शिंदे (वय 42, रा. वारूंजी फाटा) यांनी रविवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर राजेश जगन्नाथ शिंदे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

अरुण शिंदे हे सकाळी 7 वाजता दुकानात जातो, असे सांगून घरातून गेले. मात्र, ते दुकानात गेले नाहीत आणि घरीही परत आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, आगाशिवनगरमधील दांगट वस्तीतील एका खोलीत त्यांनी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चार जणांवर गुन्हा
पुढील बातमी
जिल्ह्यात भक्ती आणि शक्तीचा सोमवारपासून जागर

संबंधित बातम्या