चारचाकीच्या धडकेत महिला जखमी

by Team Satara Today | published on : 22 March 2025


सातारा : चारचाकीच्या धडकेत महिला जखमी झाल्याप्रकरणी गाडी चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पादचारी महिलेस चुकीच्या पध्दतीने कार चालत पाठीमागून धडक दिल्याप्रकरणी कारचालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात दि. 11 रोजी सायंकाळी 5.30 वाजता घडला. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात सारिका शंकर घोरपडे (वय 38, रा. वेळे कामटी, ता. सातारा, सध्या रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. सारिका घोरपडे या लावंड हॉस्पिटल येथून चालत निघाल्या होत्या. त्यावेळी एमएच11 सीजे 5733 ही कार पाठी मागून येवून धडकली. पोलीस हवालदार कारळे तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
अवैधरीत्या दारुविक्री दोनजणांवर कारवाई

संबंधित बातम्या