सातारा : कोंडवे येथील सील केलेल्या मिळकतीत अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळकत नं. २४०५, गट नं. १८५/६ब/२ ही मालमत्ता मा. कोर्ट कमिशनर यांच्या आदेशानुसार ३० ऑक्टोबर रोजी सील करण्यात आली होती. मात्र बबलू संपत वायदंडे, अलका बबलू वायदंडे व हिरितेश बबलू वायदंडे (सर्व रा. कोंडवे) यांनी सीलचे कुलूप तोडून बेकायदेशीर प्रवेश केला. याप्रकरणी शाहरुख राजू शेख (वय ३१, रा. ४०९/४१०, सदर बाजार) यांनी फिर्याद दिली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार कांबळे करत आहेत.