युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

by Team Satara Today | published on : 10 August 2025


कराड : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी शिवराज मोरे यांची निवड झाल्यानंतर कराड मध्ये प्रथमच आगमन झाले. शिरवळ पासून कराड या दरम्यानच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर त्यांचे जोरदार हार घालून जल्लोषी स्वागत करण्यात आले. शिवराज दादा आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच वादा शिवराज दादा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी काँग्रेस एकसंघाची हाक दिली.
तासवडे टोल नाका येथे कराड उत्तर काँग्रेस कमिटीकडून शिवराज मोरेंचे जोरदार स्वागत करण्यात आले.
शिवराज मोरे यांचे कराड शहरात आगमन होताच त्यांनी कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन करून दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन केले. यानंतर शिवराज मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सद्याच्या काँग्रेसच्या आव्हानात्मक परिस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण होते मात्र शिवराज मोरेंची झालेली निवड व त्यांचे कराड मधील आगमनाने वेगळाच माहोल तयार झाला. जोशाने भरलेले कार्यकर्ते गाड्यांची मोठी रॅली चौकाचौकात क्रेनला लटकणारे मोठ मोठाले हार आणि आमचा नेता शिवराज दादा, अशा घोषणा देण्यात आल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बाप्पांच्या आगमन मिरवणूका डीजेच्या वाद्यात
पुढील बातमी
जिल्ह्यातील ९ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

संबंधित बातम्या