सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षक प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना जल्लोषी शुभेच्छा दिल्या. पोवई नाक्यावर रात्री 12 वाजता मोझर यांच्या हस्ते केक कापण्यात आला. डॉल्बीसह फटाक्यांची आतषबाजी आणि त्यात उपस्थित तरुणाईने ही रात्र अक्षरश: दणाणून सोडली.
अखंड हिदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा 24 फेब्रुवारी हा वाढदिवस म्हणजे सातारकरांसाठी एकप्रकारचा सणच असतो. दिवसभर शहरासह जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण असल्याने तरुणाईचा उत्साह हा चरमसीमेला पोहोचलेला असतो. त्याला कारणही तसेच आहे. जनसामान्यांमध्ये रमणारे व्यक्तिमत्व, राजघराण्यात जन्म घेवूनही सर्वसामान्यांना आपल्या घरातला माणूस आहे, असे वाटणे, या सद्गुणांमुळेच उदयनराजे हे सर्वसामान्यांना आपले वाटतात.
23 फेब्रुवारी च्या मध्यरात्री 12 वाजता रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच खा. उदयनराजे यांचे कट्टर समर्थक सुशीलदादा मोझर यांनी उदयनराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोवई नाक्यावर भव्यदिव्य पद्धतीने वाढदिन साजरा केला. हजारो तरुणाईच्या उदयनराजे-उदयनराजे यांच्या घोषणांनी आसमंत भारुन गेला होता. याचवेळी डॉल्बीचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी आणि बेधुंद तरुणाईने पोवई नाक्याचा परिसर गुंजत होता. त्याचवेळी अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांची ग्रॅण्ड एन्ट्री झाली आणि तरुणाईने हा परिसर अक्षरश: उचलून धरला.
खा. उदयनराजे यांच्या सांगण्यावरुन सुशीलदादा मोझर यांनीच केक कापला. यावेळी डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाईने आपल्या लाडक्या उदयनराजेंना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना सुशीलदादा मोझर म्हणाले, खा. श्री. छ. उदयनराजे यांचा वाढदिवस म्हणजे सातारकरांसाठी एक पर्वणीच असते. त्यांच्या लोकप्रियतेमुळेच मुंबईच्या मंत्रालयापासून ते सातारपर्यंत त्यांचे भव्यदिव्य फ्लेक्स उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी आणि हजारो तरुणाईची उपस्थितीच महाराजसाहेबांना वाढदिनाच्या मोठ्या शुभेच्छा आहेत.