सातारा : सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या शासकीय वसतिगृहाचे गृहपाल तसेच निवासी शाळेतील मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून उत्कृष्ठ कार्य करणा-या प्रत्येक विभागातील तीन गृहपाल व तीन मुख्याध्यापक / सुनिल जाधव, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातासहाय्यक शिक्षक यांना सन 2022-2023 पासून प्राविण्य पुरस्कार देवून गौरविण्यात येत असल्याची माहिती यांनी दिली.
पुणे विभागाचा प्राविण्य पुरस्कार वितरण सोहळा वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, पुणे विभाग, पुणे यांचे अध्यक्षतेखाली 12 सप्टेंबर 2025 रोजी सातारा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय या परिसरातील सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे उपायुक्त व पुणे विभागातील समाज कल्याण चे सर्व सहाय्यक आयुक्त तसेच पुरस्कारार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी वंदना कोचुरे म्हणाल्या, समाज कल्याण विभागाची शासकीय वसतिगृहे व निवासी शाळेतील प्रवेशित अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्यांना उपलब्ध सोयीसुविधा वेळेत पुरविणे, वसतिगृहाचा दर्जा सुधारीत करुन प्रवेशितांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पाठपुरावा करणे, त्यांच्या तक्रारीचे निराकरण करणे व स्थानिक पालक म्हणून प्रवेशितांची काळजी घेणे इ. मौलिक कार्य गृहपाल, मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांना करावे लागत असल्याने सन 2025 च्या पुरस्कारासाठी निवड केलेले गृहपाल, मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक हे निश्चितच पुरस्कारासाठी पात्र आहेत याची मला खात्री आहे.
पुरस्कार वितरण सोहळयापूर्वी संविधान स्तंभास पुष्पहार अर्पण करुन सामाजिक न्याय भवन परिसरामध्ये मान्यवरांचे हस्ते विविध फळ झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल जाधव, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांनी तर सूत्रसंचालन मिलिंद कांबळे यांनी केले. यावेळी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व शासकीय वसतिगृहाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.