सातारा : सातारा तालुक्यातील एका विवाहित महिलेने सासरच्या मंडळींकडून जाचहाट होत असल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चंद्रकांत सावंत, अदिक सावंत, विजया सावंत, हर्षदा सावंत (सर्व रा. काेरेगाव) यांच्या विरुध्द सौ. प्रणाली चंद्रकांत सावंत (वय २६, रा. कोरेगाव सध्या रा.कळंबे ता.सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
'तूला घरातील काम येत नाही. तू नोकरी सोड. घर सांभाळ. माहेरहून फ्रीज, सोफासेट आण,' असे म्हणत विवाहितेला शारीरीक, मानसिक त्रास दिला. ही घटना २०२२ ते २०२५ या कालावधीत घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.