जिल्ह्यात साडेसात हजार महिलांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ

केंद्र सरकारच्या 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' अभियानाला साताऱ्यात प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 24 September 2025


सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान केंद्र सरकारने राज्य शासनाच्या सहकार्याने 'स्वस्थ  नारी सशक्त अभियान' राबवले आहे. या अभियानाचा सातारा जिल्हा रुग्णालया सह उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आत्तापर्यंत साडेसात हजार महिलांनी लाभ घेतला आहे. 

या शिबिरामध्ये महिलांना ॲनिमिया तोंड व स्तनाच्या कर्करोगाचे निदान मधुमेह उच्च रक्तदाब आणि क्षयरोग इत्यादी वीस हजारांची तपासणी करण्यात येते. ही तपासणी जिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत स्वरूपाची आहेत. आरोग्य विषयी स्त्रियांची जागरूकता वाढवण्यासाठी आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्य तपासणी सह उपचार व आवश्यक संदर्भ सेवा व समुपदेशन करण्यात येत आहे.

शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा : डॉ. युवराज करपे 

रक्तदाब,  मधुमेह, वात रोग तपासणी,  स्तन व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूती पूर्व तपासणी,  लसीकरण सेवा रक्त व हिमोग्लोबिन तपासणी क्षयरोग तपासणी सिकल सेल आजार इत्यादी तपासणी महिलांची करण्यात येत आहे.  महिलांच्या आजारानुसार त्यांना उपचार सुविधा उपलब्ध करून देणे या संदर्भातही या शिबिराद्वारे मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे जिल्हा शल्य  चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी सांगितले.  ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिकांच्या नियोजना खाली हे शिबिर होईल असे त्यांनी स्पष्ट केले. या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यातील रस्त्यांसाठी 1296 कोटी रुपयांचा निधी
पुढील बातमी
संमेलन अध्यक्षपद स्वीकारणे ही वैचारिक आत्महत्या; संमेलनावर बहिष्कार घालावा

संबंधित बातम्या