सातारा : सातारा एमआयडीसी येथे लोखंडाचा दीड लाख रुपये किंमतीचा खिस चोरल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाळ केंजळे व महेश कोळी या दोघांविरुध्द विद्याधर शिवाजी गोसावी (वय 46, रा. भोसरी, पुणे) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 11 मे रोजी घडली आहे. मुथा कंपनीच्या वतीने धनश्री इंडस्ट्रीजच्या मेन गेटवर असलेल्या दोघांवर ही तक्रार देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.