नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडून राजवाडा मंडईची पाहणी; पायाभूत सुविधा देण्याचे बांधकाम विभागाला निर्देश ; सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात चर्चा

by Team Satara Today | published on : 13 February 2026


सातारा : साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी बांधकाम विभागाच्या यंत्रणेसह शुक्रवारी सकाळी राजवाडा भाजी मंडईची पाहणी केली .भाजी मंडईला पायाभूत सुविधा देण्यासंदर्भात नगराध्यक्षांनी बांधकाम विभागाला स्पष्ट निर्देश दिले. तसेच मंडईच्या सुरक्षिततेसाठी बेसमेंटला सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी आरोग्य सभापती धनंजय जांभळे मंडई निरीक्षक प्रशांत निकम बांधकाम अभियंता विनोद दहिफळे इत्यादी उपस्थित होते .नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दालनात येण्यापूर्वीच यंत्रणेला थेट राजवाडा भाजी मंडईत पाचारण केले. येथील विक्रेते आणि नागरिक यांच्याशी सुद्धा सुविधा देण्या संदर्भात चर्चा केली. राजवाडा भाजी मंडई चे पार्किंग तळ हा रिकामटेकड्यांचा अड्डा बनला असून येथे मद्यपींची रात्री गर्दी असते. रात्री अंधार असल्यामुळे येथे जाण्याला कोणी धजावत नाही अशा तक्रारी यावेळी नागरिकांनी केल्या. 

अमोल मोहिते यांनी राजवाडा भाजी मंडईचा परिसर सीसीटीव्हींनी सज्ज असावा. पार्किंगला पेव्हर ब्लॉकटाकून संपूर्ण इमारतीला नव्याने रंगकाम करण्यात यावे यासंदर्भात आराखडा बनवण्यासाठी बांधकाम विभागाला त्यांनी निर्देश दिले. याशिवाय तांदूळ आळी नगर वाचनालय परिसर व येथील स्वर्गीय अभयसिंहराजे व्यापारी संकुलाची त्यांनी पाहणी केली. 

या परिसरामध्ये वाढलेल्या टपऱ्या, रिक्षा स्टॉप तसेच चांदणी चौकामध्ये वारंवार होणारे ट्राफिक जाम या परिस्थितीची पाहणी करून त्यांनी तात्काळ कोणत्या उपाययोजना करता येतील या संदर्भामध्ये नियोजन आणि बांधकाम विभागाची लवकरच बैठक घेण्यात येईल असे अमोल मोहिते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.अभयसिंह राजे व्यापारी संकुल यामध्ये इमारत गळतीची फार मोठी समस्या आहे या इमारतीचे तत्काळ पावसाळ्यापूर्वी वॉटरप्रूफिंग करणे गरजेचे आहे .या संदर्भातही तातडीने निर्णय घेतला जाईल असे अमोल मोहिते म्हणाले. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हयाच्या हितासाठी सर्वपक्ष मिळून सर्वसमावेशक निर्णय घेणे गरजे - पालकमंत्री भूराज देसाई; : सातारा शहर संघटनेच्यावतीने तलवार भेट
पुढील बातमी
आदिनाथ ओंबळे यांच्या पुढाकारातून कातकरी बांधवांसाठी दिलासादायक पाऊल : मेणवली येथे ३४ लाभार्थ्यांना १७ गुंठे जमीन उपलब्ध

संबंधित बातम्या