सातारा : गोडोली, गोळीबार मैदान, विलासपूर, विसावा नाका या भागात शेकडो कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली आहेत. या भागातील पाणीप्रश्न सोडवला आहे. रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत. अनेक ठिकाणी विविध कामे प्रगतीपथावर आहेत. संपूर्ण भागासह गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
गोडोली येथे नियोजित १ कोटी ६५ लाख निधीचे स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले क्रीडा संकुल (कबड्डी, हॉलीबॉल, कुस्ती आखाड्यासह), म्हस्के कॉलनी व बागडी वस्ती येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, देवी कॉलनी येथील ओपन स्पेस विकसित करणे आदी सुमारे २ कोटी ३८ लाख निधीच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक शेखर मोरे पाटील, अविनाश कदम, शकील बागवान, मनीषा काळोखे, व्यंकटराव मोरे, आशुतोष चव्हाण, सुनील मोरे पाटील, नारायण साळुंखे, रणजित साळुंखे, फिरोज पठाण, रवी पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा शहरातील प्रत्येक भागात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवल्या आहेत. नागरिकांच्या सूचनेनुसार सर्व प्रकारची विकासकामे मार्गी लावली आहेत. रस्ते काँक्रीटीकरण करण्यावर भर दिला असून राज्य सरकारच्या माध्यमातून त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून घेतला आहे. सातारा शहराच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या त्रिशंकू भागात विकासकामे मार्गी लावण्यावर भर दिला आहे. नागरिकांच्या समस्या सोडवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण नेहमीच पार पाडले आहे.
सुनील मोरे पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुधाकर साळुंखे, लक्षण मोरे, राजू मोरे, धृपद मोरे, अमित महिपाल, अशोक जावळीकर, संतोष साळुंखे, पोपटराव मोरे, बाळासाहेब मोरे, शिवाजी मोरे, माधव मोरे, पंडितराव मोरे, अशोक मोरे, उत्तमराव नावडकर, अमोल नलावडे, प्रकाश घुले, श्रीकांत जाधव, नितीराज सूर्यवंशी, प्रमोद मोरे, आनंद मोरे, राजू श्रीरंग मोरे, रामचंद्र मोरे, आप्पा बनकर, चंद्रकांत मोरे, विलास शिंदे, धनंजय शिंदे, सचिन कामटे, देविदास जाधव, संतोष धुमाळ, पूनम निकम, मंगल साळुंखे, प्रकाश घाडगे, योगेश म्हस्के, वामनराव म्हस्के, सागर म्हस्के, बबलू शिंदे, सागर जगताप, कृष्णत मोरे, नवनाथ काकडे, आशिष साळुंखे, केतन जाधव, मोहित खुस्पे, धीरज दिसले, संदीप कुडाळकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.