सातारा : सातारा शहरालगतच्या बिलासपूर येथील साई कॉलनी मध्ये रात्री उशिरा बिबट्याने भरवस्तीत येऊन कुत्र्याचे पिल्लू पळवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना कॅमेराबद्ध झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. म्हणून वनविभागाने येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. सातारा शहरालगतच्या डोंगर भागामध्ये हिंस्त्र प्राणी वाढत्या शहरीकरणामुळे थेट मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. आठ दिवसापूर्वी माची पेठेमध्ये तीन तरस थेट मानवी वस्तीत आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. यावेळी तरसाएवजी बिबट्याने थेट साई कॉलनी येथून भर रस्त्यावरून कुत्र्याचे पिल्लू पळवल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. विलासपूर येथून उंटाचा डोंगर हा वनविभागाचा परिसर नजीक असल्यामुळे येथे बिबट्याचा सर्रास वावर आढळतो. वनविभागाच्या हद्दीलगत सातारा शहराच्या हद्दीतील कोल्ह्यांचे क्षेत्र वाढल्यामुळे बिबट्यांचा कॉरिडॉर प्रभावित झाला आहे. साई कॉलनीच्या एका बंगल्यामध्ये सीसीटीव्ही असल्याने हा थरारक प्रकार चित्रित झाला आहे. या कॅमेर्यामध्ये एक युवती घराबाहेर फिरत असताना कुत्र्याची दोन पिल्ले रस्त्यावर होती. त्यावेळी बिबट्याने अचानक तेथे येऊन पिल्लांवर हल्ला केला आणि त्यातील एक पिल्लू पळवले. त्यामुळे साई कॉलनीमध्ये रात्री शतपावलीसाठी फिरणाऱ्या नागरिकांचीही अडचण झाली आहे. सातारा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांना या घटनेची कल्पना देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी वन विभागाचे पथक या भागाला भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे.
विलासपूर येथे बिबट्याने पळवले कुत्र्याचे पिल्लू
नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण; वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
by Team Satara Today | published on : 24 December 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शाहुनगर येथे अज्ञात चोरटयांनी केली ५९ हजाराची घरफोडी
November 01, 2025
साताऱ्यात तडीपारीच्या आदेश भंग केल्याप्रकरणी नितीन सोडमिसेवर गुन्हा
November 01, 2025
बोरगाव येथे जुगार अड्डयावर कारवाईत एकावर गुन्हा दाखल
November 01, 2025
तुटपुंज्या मनुष्यबळावर वेतन व भविष्य पथकाचा गतिमान कारभार
November 01, 2025
पाटखळ येथे जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
November 01, 2025
सातारा शहर परिसरात अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी पाच जणांवर कारवाई
November 01, 2025