फलटण : ट्रकने दिलेल्या धडकेत धुळदेव येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दत्तात्रय बिरमल खरात (वय 53, रा. धुळदेव ता. फलटण) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
फलटण पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 12 .15 वाजता फलटण-पंढरपूर रस्ता व फलटण बायपास पालखी महामार्ग एकत्र होत असलेल्या धुळदेव ता. फलटण येथे अशोक लेलँड ट्रक (एमएच 11 सी एच 3160) चालकाने दत्तात्रय खरात यांच्या मोटरसायकल (क्र. एम एच 11 सीपी 5382) ला समोरून जोरात धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी होऊन मोटरसायकल चालक दत्तात्रय खरात यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक गणपत भानुदास उगलमोगले (रा सोकासन ता.माण) हा पळून गेला. घटनेची फिर्याद चैतन्य खरात यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सपोनि नितीन शिंदे करत आहेत.