मुंबई : महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आता आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतील. दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर रोजी संपत आहे. मल्होत्रा RBI चे 26 वे गव्हर्नर असतील. त्यांची नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. 11 डिसेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ सुरू होईल. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.
संजय मल्होत्रा हे राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते नोव्हेंबर 2020 मध्ये REC चे अध्यक्ष आणि MD झाले. याआधी ते ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. 2022 मध्ये, वित्तीय सेवा (DFS) विभागाचे सचिव संजय मल्होत्रा यांचे केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे (RBI) संचालक म्हणून नामनिर्देशन केले.
11 डिसेंबर रोजी संजय मल्होत्रा RBI चे नवे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ पुढील 3 वर्षांचा असेल. ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26 वे गव्हर्नर असतील. वास्तविक, रिझर्व्ह बँकेचे कामकाज केंद्रीय संचालक मंडळ पाहते आणि अशा परिस्थितीत संजय मल्होत्रा यांना या कामाचा दीर्घ अनुभव आहे, त्यामुळे ते आरबीआयच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत आघाडीवर राहिले.
संजय मल्होत्रा यांनी आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तर प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. गेल्या 30 वर्षांपासून मल्होत्रा यांनी ऊर्जा, वित्त, कर, आयटी आणि खाण या खात्यांमध्ये काम केले आहे.
संजय मल्होत्रा हे महसूल सचिव या पदावर कार्यरत आहेत. मल्होत्रा यांची आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ते हे पद सांभाळतील. संजय मल्होत्रा हे १९९० बॅचचे राजस्थान केडरचे IAS (भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी) आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. मल्होत्रा यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, यूएसए येथून पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.