अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 04 June 2025


सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 एप्रिल 2025 रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास निगडी वंदन, पोस्ट कामेरी, ता. सातारा येथे तेथीलच ज्ञानू बंडू मोरे या पादचारी वृद्धास पाठीमागून धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी दुचाकी क्र. एमएच 11 डीजे 6988 चा चालक विश्वनाथ विनायक गमरे रा. चिंचणी, पोस्ट कामेरी, ता. सातारा याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अटकाव प्रकरणी दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
शिवीगाळ, धमकी प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या