पुसेगाव : पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी सहभागी होऊन जागरूकता अभियानाचे आयोजन करण्यात आले.एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती करणे, समाजातील गैरसमज दूर करणे आणि सुरक्षिततेबद्दल लोकांना संवेदनशील बनविणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट होते. कार्यक्रमाची सुरुवात जागरूकता रॅलीने झाली.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. “जागरूकता हीच बचावाची ढाल”, “भेदभाव नाही—संवेदनशीलता हवी”, "चाचणी करा, स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवा"“एड्सचा धोका टाळा—सुरक्षिततेला साथ द्या” एकत्र येऊ , एड्स मुक्त जग घडवू "अशा प्रभावी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीदरम्यान एड्सविषयी योग्य माहिती देणारे फलक, पोस्टर्स आणि जनजागृती संदेशांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.रॅलीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत एचआयव्ही ,एड्सविषयी आवश्यक माहिती पोहोचविण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून सामाजिक संदेश प्रभावीपणे प्रकट झाला.“एड्सविषयी अज्ञान, लाज आणि गैरसमज हेच या आजाराच्या प्रसारामागील मोठे कारण आहे. त्यामुळे माहितीचा प्रसार आणि खुली चर्चा ही काळाची गरज आहे.” सदर अभियानाचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले,व प्रा.डाॅ.संजय क्षीरसागर,यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.के.जी.कुंभार ,प्रा.डॉ.एच.जी. निमसे ,कमिटीतील सर्व सदस्य प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक,विद्यार्थी विद्यार्थिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.एड्समुक्त समाजाची निर्मिती हेच सर्वांचे एकत्रित ध्येय असल्याचे सांगून रॅली कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.