उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी कोरेगावात शोकसभा

by Team Satara Today | published on : 30 January 2026


कोरेगाव : कोरेगाव तालुक्याच्या विकासात अतुलनीय योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या पार्श्वभूमीवर कोरेगाव शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने शनिवार, दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता जुना मोटार स्टॅण्ड येथील दिलीप मल्टीपर्पज हॉलमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अजितदादा पवार यांनी कोरेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा कायापालट झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी कोरेगाव शहरात गुरुवारी सर्वपक्षीय बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आला होता.

त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्वर्गीय आमदार दत्ताजीराव बर्गे सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत शनिवारी शोकसभा घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

या शोकसभेस कोरेगावकर नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोकशाही जागृत ठेवण्यासाठी समाजमन जागरूक ठेवावे - कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के; लोकशाही अमृत महोत्सव निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पुढील बातमी
महानगरपालिका निवडणुकांनंतर एकत्र येण्यावर चर्चा झाली होती -आमदार शशिकांत शिंदे; सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण

संबंधित बातम्या