सातारा : सव्वा लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पवन पांडुरंग घाडगे रा. क्षेत्र माहुली, ता. सातारा यांचा गाई पालनाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडून 22 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बंटी अभिमान पवार आणि किरण अभिमान पवार रा. अकलूज यांनी एक लाख 72 हजार रुपयांचा गाईंचा व्यवहार केला होता. त्यातून सव्वा लाख रुपयांच्या गाई घेऊन जाऊन व्यवहाराची रक्कम घाडगे यांना न देता संबंधितांनी त्या गाई परस्पर दुसऱ्या कोणास तरी विकलेल्या आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार लोहारे करीत आहेत.