09:15pm | Nov 02, 2024 |
सातारा : भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे साडेदहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिली कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पार पाडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी विधानसभा निवडणूक आचारसंहिता व दिवाळीच्या अनुषंगाने कॉम्बिंग ऑपरेशन करून कारवाया करण्याबाबतच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार देवकर यांनी कॉम्बिंग ऑपरेशन साठी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार केले आणि त्यांना सूचना तसेच मार्गदर्शन केले होते.
दि. 1 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कॉम्बिंग ऑपरेशन करीत असताना देवकर यांना त्यांच्या बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, सातारा शहरा नजीकच्या पुणे-बेंगलोर महामार्गावर एकजण इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा माल बाळगून विक्रीसाठी थांबलेला आहे. या माहितीच्या अनुषंगाने पाहणी करून तात्काळ कारवाई करण्याबाबत देवकर यांनी पथकास सूचना दिल्या. या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन संशयिताचा शोध घेतला असता त्या ठिकाणी दोन पोती घेऊन संशयितरित्या फिरणाऱ्या एकाचा संशय आल्याने त्यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे विचारपूस केली असता तो पहिल्यांदा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तसेच त्याच्याजवळ असलेल्या दोन पोत्यांमधील बॉक्सची तपासणी केली असता भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या परदेशी बनावटीच्या ई सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण दहा लाख 41 हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडला. संबंधित इसम परराज्यातील असून त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडुकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, पोलीस हवालदार सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, हसन तडवी, सनी आवटे, मुनीर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे, मनोज जाधव, धीरज महाडिक, वैभव सावंत यांनी सहभाग घेतला. या पश्चिम महाराष्ट्रातील ई-सिगारेट वरील पहिल्या कारवाईबाबत सहभागी असलेल्या अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबनीस यांनी अभिनंदन केले आहे.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |