भगवानदास काशीराम अग्रवाल राहणार समर्थ मंदिर, यादोगोपाळ पेठ व मुस्ताक मोहम्मद बागवान राहणार 17 देशमुख कॉलनी, सदर बाजार या दोघांनी विनापरवाना फटाक्यांचा अवैध साठा केला होता.
जुन्या एमआयडीसीतील शासकीय डेअरीच्या शेजारी व्ही ट्रान्स गोडाऊनमध्ये हा साठा ठेवण्यात आला होता. सातारा पोलिसांनी पंचांच्या समक्ष सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शाम काळे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.