सातारा : कानपूर उत्तर प्रदेश येथे मुस्लिम बांधवांनी पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढली होती. या यात्रेमध्ये मुस्लिमबांधवांनी धार्मिक श्रद्धेचा भाग असणारे फलक झळकवले होते . या संदर्भाने तेथील पोलिसांनी 25 मुस्लिम बांधवांवर गुन्हा दाखल केला. हे प्रकरण न्याय समानता आणि मानवी हक्कांच्या तत्त्वांचा भंग करणारी आहे. यासंदर्भात साताऱ्यातील मुस्लिम बांधवांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.
या निवेदनात नमूद आहे की, कानपूर उत्तर प्रदेश येथे मुस्लिम बांधवांवर असणारे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्कर्ष चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी. धार्मिक अभिव्यक्तीचे अधिकार स्पष्टपणे सुरक्षित राहतील यासाठी केंद्र शासनाने मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या तसेच या मागण्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुस्लिम बांधवांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. या निवेदनावर सुमारे 15 मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षरी आहेत.