दिव्यांग व्यक्तींना मिळणार फिरत्या वाहनावरील दुकान

महाराष्ट्र राज्य वित्त व विकास महामंडळाचे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 25 January 2025


सातारा : दिव्यांग व्यक्तीना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान -.(मोबाईल ऑन ई व्हेइकल)महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत मोफत उपलब्ध् करुन देण्यात येत आहे. 

दिव्यांग व्यक्तीना पुरेशा सोयी उपलब्ध करुन देवुन रोजगार निर्मितीस चालना देणे,आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना कुटुंबासोबत जीवन जगण्यास सक्षम करणे हा  या योजनेचा उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तीनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नावनोदंनी करण्यासाठी पोर्टल दिनांक २२ जानेवारी ते ६ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. या योजनेत लाभ घेण्यासाठी http://regester.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्याात आली आहे.या योजनेचा जास्तीतजास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन दिव्यांग  व वित्त विकास महामंडळ सातारा यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लेखन कौशल्य विकसन कार्यशाळेस प्रतिसाद
पुढील बातमी
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोटामुळं छत कोसळले

संबंधित बातम्या